मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब (तथा) प्रकाश आंबेडकरसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून दहिसर विधानसभा क्षेत्राचे प्रसिद्ध समाजसेवक विकास चव्हाण यांनी अनेक असे लोकहित कार्य केले असून व राजकीय पक्षांचे वार्ड अध्यक्ष ते जिल्हा अध्यक्ष पदावर काम केले आहे. व आता विकास चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असून स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी यांची मुंबईत कार्यकारिणीची बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष
डॉ.निलेश विश्वकर्मा यांनी संवाद साधला तसेच आगामी काळात मुंबई जिल्हा,तालुका,वाँड, कार्यकारिणी येत्या काळात जाहीर करणार यावेळी मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर,महासचिव प्रशांत खर्चात,सचिव डेव्हिड व मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते आणि उत्तर मुंबई जिल्हयातील (समाजसेवक) विकास चव्हाण आणि त्याचे सहकारी मित्र प्रशांत मोहीते,किशोर कांबळे ,रोहन गालफाडे,अशोक भंडारी,चिराग मांयावशी,धमानंद जाधव,अशोक घुगे,बालाजी जाधव,तुषार चव्हाण,सुशिल जाधव,राजेश मस्तेकर,यांनी वंचित बहुजन युवा आघाडी प्रवेश केला आहे.