मागाथाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी प्रभाग क्र.२६ भीमनगर, सातारा कॅम्प, लहुगड, गौतम नगर, रामगढ, कांदिवली ( पूर्व ) या वनविभागातील रहिवाशांना घरे तोडण्याची नोटीस देण्यात आली होती.
यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब आमदार प्रकाशदादा सुर्वे यांना समजताच नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन-संचालक मल्लिकार्जुन साहेब यांच्या दालनात स्थानिकांची बैठक आयोजित करून ज्या नागरिकांना घरे मिळालेली आहेत.
अशा नागरिकांनी 30 डिसेंबर पर्यंत स्वतःहून घरे खाली करण्यात यावीत आणि 2011 पर्यंत ज्यांची घरे पात्र आहेत अशा नागरिकांच्या पुराव्यांची तपासणी करून कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत आज स्वतः आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तेथील कारवाई थांबवून वनविभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे याबाबत निवेदन केले.
सदरवेळी शाखाप्रमुख सचिन केळकर, बापू चव्हाण, मच्छिंद्र डावरे, रवी हिरवे, रमेश जाधव, मेहबुब शैख, उपशाखाप्रमुख बबलु चांडालिया, साहेबराव डावरे, नागेंद्र वर्माजी, राजेंद्र कांबळे, विशाल जाधव, परशु जमादार, परमेश्वर रसाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते.