मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत येणाऱ्या कांदिवली पूर्वेकडील सरस्वती, वसंत सागर इमारत, ठाकूर व्हिलेज परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य माझ्या आमदार निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे.
स्थानिकांनी मागणी केल्यानंतर तातडीने हे कार्य हाती घेण्यात आले. माझ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना तातडीने सर्व गोष्टी उपलब्ध व्हाव्यात, असा माझा प्रयत्न असतो आणि यापुढेही कायम राहील.
या कार्याचे भूमीपूजन माझ्या हस्तेच व्हावा, असाही स्थानिकांचा आग्रह होता. यानुसार हा कार्यक्रम पार पडला.यावेळेस माझ्यासह विधानसभा संघटक श्री. जितू सिंग ठाकूर, उपविभाग प्रमुख आनंद डोंगरे, शेखर शेरे, म. शाखासंघटक सौ. प्रीती इंगळे, कार्यालय प्रमुख नरेश आमरे, नरेश मिश्रा, जनार्दन मोरे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.