“मेरा बुथ, सबसे मजबूत” हा मंत्र उराशी बाळगून, आज माझ्या दहिसर विधानसभेतील पश्चिम मंडळातील वॉर्ड क्रमांक ०१ व वॉर्ड क्रमांक १० मधील पक्षाचा कणा असलेल्या सर्व बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पॅराडाईज हॉल, बोरिवली पश्चिम येथे अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीत आगामी काळातील आव्हाने, बुथ रचना बळकट करणे आणि तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क वाढवणे यावर सविस्तर मंथन करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांचा जोश, शिस्त आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या प्रसंगी आमदार मनीषा चौधरी, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद यादव, पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम, मंडळ महामंत्री बावाजी, विनोद शास्त्री, जिल्हा विस्तारक सज्जन सिंग, युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक म्हात्रे, अनुसूचित जमाती विभाग अध्यक्षा पार्वती धोडी, वॉर्ड अध्यक्ष कुश ढेबर, अजय मोर्या तसेच मंडळ व वॉर्डचे सर्व पदाधिकारी आणि या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले मोठ्या संख्येने बुथ व शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

