Abhishek Ghosalkar यांनी अंगणवाडी सेविकांसोबत केली भाऊबीज साजरी

Abhishek Ghosalkar यांनी अंगणवाडी सेविकांसोबत केली भाऊबीज साजरी

Spread the love

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी आज शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर या आपल्या लाडक्या भाऊरायाला आरती ओवाळत भाऊबीज साजरी केली. बोरिवली पश्चिमेकडील 50 हजार लोकसंख्या असलेल्या गणपत पाटिल नगर या वस्तीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होण्याची भीती वर्तविली जात होती.

मात्र स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी दररोज आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागातील अंगणवाडी सेविकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानुसार सालाबाद प्रमाणे आज अंगणवाडी सेविकांनी अभिषेक घोसाळकर यांच्यासमवेत भाऊबीज साजरी केली.

कोरोनाच्या संकटकाळात अंगणवाडी सेविकांनी केलेले कार्य बहुमूल्य असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी घोसाळकर यांनी अंगणवाडी सेविकांना भेटवस्तू देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला शाखासंघटक ज्यूडी मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, लालचंद पाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *