महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी जागतिक महामारी कोविड या दीर्घ आजाराशी लढा देत मुंबईकरांची अहोरात्र सेवा केली.
कोरोनाच्या संकटात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावत लोकसेवा केली. त्यांचा आज कामगार सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. मुनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून कोविड १९ चे उल्लेखनीय काम करण्यात आले.
म्हणून संघटनेच्या माध्यमातून समस्त कामगार वर्गांना कोविड योद्धाचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे चांगले काम म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना याच्या प्रमुख उपस्थितीत
अध्यक्ष बाबा कदम, जनरल सेक्रेटरी सत्यवान जावकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे माजी नगरसेवक,मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर तसेच संघटनेचे चिटणीस संजय वाघ, महेश गुरव आणि पश्चिम उपनगरातील स्थानिक कमिटी अध्यक्ष दत्ता राव,
उपाध्यक्ष चंद्रकांत दिवाळे,सरचिटणीस राजेश इंदुलकर स्थानीक पदाधिकारी आणि कामगार बंधू यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यकारी अभियंता परिवहन पश्चिम उपनगरे या खात्यांचे बोरीवली यांनगृहाचे सहायक अभियंता पिंपळे आणि स्थानिक अधिकारी दुय्यम अभियंता दळवी साहेब कनिष्ठ अभियंता यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी व सभासद उपस्थित होते. संघटनेने केलेल्या सन्मानपत्र आदराने कामगार भारावून गेले होते.याप्रसंगी संपूर्ण बोरीवली यांनगृह भगवामय झाले होते.