शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दहिसर विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना शाखा क्रमांक 1 तर्फे रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले . त्यानंतर दहिसर मधील विविध विभागात नागरिकांना 2 हजार स्टीमर्स मशीन व 5 हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
तसेच दहिसर पश्चिम कांदरपाडा बस डेपो जवळील 17 आसनी शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले.
घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेने काल दहिसर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.त्यामध्ये 64 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पोलिसांना मास्क तसेच कोलेस्टेरॉल पावडर आदींचे वाटप केले. याप्रसंगी शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस,महिला संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक,
मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले, कर्णा अमीन, संजय भोसले,
शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा,युवा सेनेचे जितेन परमार, आकाश मलशेट्टि, दर्शीत कोरगावकर सहित कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनामुळे संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्रीमंडळ, पदाधिकारी, शिवसैनिक या संकटाचा एकदिलाने सामना करत आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस यंदा साजरा न करता
शुभेच्छांसाठी करण्यात येणारा पैश्यांचा विनियोग आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तसेच आपल्या विभागातील गरजू लोकांकरीता करण्याचे आवाहन विनोद घोसाळकर यांनी केले होते.त्यास अनेकांनी प्रतिसाद दिला।