बोरिवली पश्चिम गोराई गाव टलझन (एस्सलवर्ड नजिक)अठराव्या दशकापासून ११ कुटुंबांचे वास्तव्य आहे। त्या रहिवाशांनी विज पुरवठ्याकरीता अदानीला अर्ज केले होते। त्याला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागअध्यक्ष प्रसाद कुलापकर यांच्या उपस्थितीत अदानी अधिकाऱ्यांबरोबर भेट घेण्यात आली। विज पुरवठ्याच्या विषयाला अधिकाऱ्यांमार्फत खुप चांगला प्रतिसाद मिळाला असून कामाची त्वरित सुरूवात करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे।
यावेळेस स्थानिक शाखा अध्यक्ष महेश लक्ष्मण नर, उपशाखा अध्यक्ष विवेक कोरे व टलनचे रहीवासी उपस्थित होते.