दहिसर विधानसभा क्षेत्रासाठी शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवस विनामूल्य लसीकरण मोहीमेचे उद्घाटन शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर व विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना विभाग क्रमांक 1 तर्फे दहिसर- बोरीवली-मागाठणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने व रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल च्या सहकार्याने तब्बल 16 हजार लसी देण्यात येणार आहे.
दहिसर विधानसभेसाठी सीपी गोयंका हायस्कूल, आय सी कॉलनी, लिंक रोड बोरिवली पश्चिम याठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळपासून लसीकरण केंद्रावर नागरिकांची भली मोठी रांग दिसून आली.
प्रत्येक प्रभागासाठी वेळेनुसार नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना ताटकळत न राहता लसीकरण लवकर होत होते. लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी चहा-पाणी-बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती.
याठिकाणी उद्या शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी देखील सकाळी 9 ते 4 वाजे पर्यंत विनामूल्य लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.याप्रसंगी महिला संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे, नगरसेवक हर्षद कारकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर,
आर उत्तर सहाय्यक उपविभाग संघटक, आयुक्त मृदुला अंडे, वैद्यकीय अधिकारी अविनाश वायदंडे दिपा पाटील, शकुंतला शेलार उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा संघटक कर्णा अमीन, किशोर म्हात्रे, बाळकृष्ण धमाले शाखा प्रमुख राजू इंदुलकर, सहित शिवसेना, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते