आय सी कॉलनी ,कांदरपाडा येथून म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते 3 वातानुकूलित बस सेवेचे उद्घाटन।

आय सी कॉलनी ,कांदरपाडा येथून म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते 3 वातानुकूलित बस सेवेचे उद्घाटन।

आय सी कॉलनी,कांदर पाडा येथून आज 3 वातानुकूलित बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आली. शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या अथक प्रयत्नानी व सतत पाठपुराव्यामुळे

बस क्रमांक 206 प्रबोधनकार ठाकरे नगर ते आय सी कॉलनी, बस क्रमांक 245 कांदरपाडा बस डेपो ते प्रबोधनकार ठाकरे नगर व बस क्रमांक 240 कांदरपाडा बस डेपो ते शांती आश्रम अशी वातानुकूलित बस सेवा सुरु करण्यात आली.

सदर वातानुकूलित बस सेवेचे उद्घाटन शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आय.सी.

कॉलनीतील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोसाळकर यांनी यावेळी वातानुकूलित बसमधून प्रवास करीत पहिले तिकीट घेतले.

तसेच बेस्ट वाहक चालक व प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

मुंबईकरांना बेस्ट सेवा देण्यासाठी बेस्ट प्रशासन नेहमीच कार्यरत असते असे प्रशंसोद्गार यांनी यावेळी काढले. मुंबईकरांसाठी उन्हातान्हाची पर्वा न करता पुराच्या तसेच कोरोनाच्या संकट काळातही

बेस्टचे वाहक-चालक नागरिकांची काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर,

शकुंतला शेलार उपविभाग संघटीका, युवा सेनेचे जितेंन परमार व दर्शित कोरगावकर मोठ्या संख्येत स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *