मुंख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब यांनी केलेल्या मी जबाबदार चला, लसीकरण करून, कोरोनाला हद्दपार करुया ! या आवाहनांनुसार शिवसेना उपनेते,
म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी विभागात लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
सद्या राज्यभरात कोरोना लसीकरण चा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांनी नोंदणी करून हि लस घ्यावी.
ही लस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण सुरक्षित आहे, याची खात्री बाळगा असे आवाहन विनोद घोसाळकर यांनी नागरिकांना केले आहे.
यासाठी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी विभागातील नागरिकांची नोंदणी करून त्यांना लसीकरण केंद्रात येण्या-जाण्यासाठी मोफत बस सेवा
उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या मोहिमेत युवा सेनेचे जितेंन परमार, दर्शित कोरगावकर, आकाश मलशेट्टीसहित कार्यकर्ते सहकार्य करत आहेत.