रिपोर्ट:- जनक दवे
मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार/विभागप्रमुख प्रकाशदादा सुर्वे यांच्या आमदार निधितुन प्रभाग क्र.११ मधील मंगलमूर्ती को.ऑप.हौ.सो चौगले नगर, बोरीवली ( पु ) आणि ला-बेलेजा को.ऑप.हौ.सो, ऋषीवन,
बोरीवली ( पु ) येथे पेव्हर ब्लॉक चे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण तसेच गणाधिश सोसाइटी यथे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच लाबेलेजा आणि लाविस्टा बिल्डिंग मध्ये गेली १५ वर्षे बृहन्मुंबई महानगर पालिकेचे पाणी उपलब्ध न्हवते खासदार गोपाळ शेट्टी साहेब आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या पाठपुराव्यामूळे सादर पाणी मिळाले.
सदरवेळी युवासेना कार्यकारीणी सदस्य राज प्रकाश सुर्वे, म.विभागप्रमुख मीनाताई पानमंद, भा.ज.पा उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, विधानसभा संघटक मनीषा सावंत, शाखाप्रमुख सुभाष येरुणकर, कार्यालयप्रमुख संतोष दावडे, सुशील दळवी आणि पदाधिकारी उपस्थित होते.