महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 1 तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्यातर्फे महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी महिलांना गृहोपयोगी वस्तू तसेच शालांत परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात येणार आहे. यावेळी स्वयंरोजगाराबाबत पालिकेचे समाज विकास अधिकारी संजय नाईक, वैशाली अय्यर, जेनिफर पॉल व डिलॉन कॉड्रोस मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभाग प्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, दहिसर विधानसभा संघटक कर्णा अमिन,शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर सहित कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.