मुंबई : सद्या मुंबईभरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत असून पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी दहिसर मधील प्रभाग क्रमांक 1 मधील उद्यानात पक्षासाठी जलपान हा उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रभागातील झेन गार्डन व रॉक गार्डन या ठिकाणी पक्षासाठी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी झाडांवर टोपल्या ठेवण्यात आल्या.
आज जागतिक जलदिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी दिली. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर पक्षांचा किलबिलाट सुरू असतो.
हे लक्षात घेता हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
तर जागतिक जलदिनानिमित्त नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग न करता सदुपयोग करावा असे आवाहन शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी केले.
उन्हाच्या तडाख्यामुळे पक्ष्यांची तहान भागवणे हे मोठे पुण्यकर्म असल्याचेही यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला संघटक ज्यूडी मेंडोसा, युवासेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर सहित शिवसैनिक उपस्थित होते.