शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्यातर्फे दहिसर विधानसभा क्षेत्रात सॅनिटायझर मशीनचे वाटप।

शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्यातर्फे दहिसर विधानसभा क्षेत्रात सॅनिटायझर मशीनचे वाटप।

Spread the love

पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता विभागा – विभागात सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटायझिंग करण्यात येणार आहे.

शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्यातर्फे स्वखर्चाने दहिसर विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागात स्वयंसेवी संस्था ना मोफत सॅनिटायझर मशीन वाटप करण्यात येणार आहे.

सार्वजनिक शौचालया तून कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.आज दहिसर प्रभाग क्रमांक 6 आंबावाडी येथे शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या

हस्ते विभागातील शौचा लयाची निगा राखणाऱ्या 20 स्वयंसेवी संस्थांना मोफत सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख, आमदार विलास पोतनीस,

स्थानिक नगरसेवक विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर,माजी नगरसेवक मुंबै संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभाग प्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख प्रवीण कुवळेकर,शाखा संघटक दर्शना भरणे सहित संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

घोसाळकर यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.दरम्यान दिवसातून 5 वेळा विभागांतील सार्वजनिक शौचा लयात सॅनिटायझर फवारणी करण्याची सूचना पालिका आर/ उत्तर प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी यावेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *