शिवसेना शाखा क्रमांक 1 तर्फे कोव्हीड सेंटरमधील परिचारिकांचा सत्कार।

Spread the love

जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आज दहिसर पश्चिमेकडील कोव्हीड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचा शिवसेना शाखा क्रमांक 1 तर्फे सन्मान करण्यात आला.

गेल्या वर्षभरापासून कोरोनच्या काळात डॉक्टरासोबतच परिचारिका दिवसरात्र रुग्णांची सेवा करीत आहेत. या परिचारिकाचा कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी दहिसर कांदरपाडा आयसीयू जम्बो कोविड सेंटरमध्ये मध्ये शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या वतीने संगीतमय अंताक्षरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

यावेळी परिचरिकांनी गाणी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. गेल्या वर्षभरात कोव्हीड सेंटरमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभव देखील परिचारकांनी यावेळी कथन केला.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी मिळून नक्कीच कोरोनाच्या संकटावर मात करू असे सांगितले.

यावेळी उपस्थित परिचारकांनी केक कापून परिचारिका दिन साजरा केला. याप्रसंगी शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडीथ, मेंडोसा युवा सेनेचे दर्शित कोरगावकर, जितेन परमार सहित पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळात सरकारच्या वतीने नियम लावण्यात आले आहे त्याचे पालन करण्यात यावे याचाही गाण्याच्या माध्यमातून संदेश यावेळी देण्यात आला.तसेच परिचारकांसाठी प्रोत्साहनपर गीत सादर करण्यात आले. शिवसेनेतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे परिचारिकांनी कौतुक करत खरंच यामुळे आम्ही सर्वजण तणावमुक्त झाल्याचे सांगितले.यावेळी परिचरिकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *