पहाटे आलेल्या मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वेकडील कांदरपाडा अग्निशमन केंद्र येथील शिवशक्ती नगर चाळीला पुराचे स्वरूप आले होते.
त्या ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये चिखलाचे पाणी भरले होते. याची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी भरपावसात कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सहकार्य केले.
तसेच येथील नागरिकांना चटई, ब्लॅंकेट, दूध, बिस्किट, खाद्य सामुग्री किट आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर उपस्थित होते.