आज राज्य स्तरीय टेली-लॉ कार्यशाळा व मेला “ जन सेवा जनता के द्वार “ हमारा संविधान हमारा सन्मान “ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई या ठीकाणी संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अभियान , सबको-न्याय हर घर न्याय , नव भारत नव संकल्प , व विधी जागृती अभियान यांची माहिती आजच्या कार्यक्रमध्ये देण्यात आली आहे.
Tele-law , न्याय बंधू , न्याय सहाय्यक , न्याय सेतू , या सर्व योजनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला CSC च्या माध्यमातून दिला जातो.सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा कायदेशीर सल्ला हवा असतो आणि मुख्यत्वेकरून पिडीत महिलांना अनेकदा कायदेशीर सल्ला हवा असतो. परंतु अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे अन्याय सहन करत राहतात.आता घराच्या जवळ असणाऱ्या CSC सेंटर वर जावून ऑनलाईन पद्धतीने तज्ञ वकिलांच्या माध्यमातून कायदेशिर सल्ला मिळवू शकता. आजच्या कार्यशाळेत नागरिकांना ह्या सेवेविषयी माहिती देण्यात आली. सोबतच CSC द्वारा दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांविषयी माहिती प्रदर्शनी द्वारे देण्यात आली.
1) श्री. ए. सुब्रमण्यम (प्रधान व प्रशासकीय न्यायाधीश, दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई )
2) श्री. संजय शिंत्रे ,आयपीएस – डीआयजी सायबर सेल महाराष्ट्र
3) श्री. सतीश हिवाळे ( सचिव DALSA )
4) श्री. अनंत देशमुख ( सचिव DALSA )
5) श्रीमती राखी गाढवे (मुख्याध्यापिका केजीएस लॉ स्कूल)
6) श्री. अमित मेहता (विधी सल्लागार पुरस्कार विजेते २०१३)
7) योगिता साळवी ( दै.तरुण भारत मुंबई )
8) वैभव देशपांडे ( CSC स्टेट हेड महाराष्ट्र )
या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित आज राज्य स्तरीय टेली-लॉ कार्यशाळा व मेला “ जन सेवा जनता के द्वार “ हमारा संविधान हमारा सन्मान “ हा कार्यक्रम संपन्न झाला आहेत.