खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि नगरसेविका सौ जया तिवाना यांच्या हस्ते वाॅर्ड क्र ५७ मालाड येथे १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले.
हे केंद्र स्थानिक नगरसेविका सौ जया तिवाना यांच्या अथक प्रयत्नाने, महानगरपालिकेच्या तत्परतेने आणि राजस्थान सेवा समितीच्या सहकार्याने स्थापन झाले.
श्रीमती जया तिवाना यांच्या वतीने कोरोना काळ लक्षात घेता केंद्रावर कोणतीही गर्दि होणार नाही याची काळजी घेतलो जाईल. यासाठी केंद्रावर येण्या आगोदर ऑनलाईन नोंदणी आवश्यक असणार आहे.
लसीकरण करण्यासाठी ईच्छुकांनी आपली नोंदणी कोवीन एप, कोविन वेबसाईट कींवा आरोग्य सेतु एप वर पिन कोड ४०००६४ हे टाकावे आणि
केंद्र राजस्थान सेवा समिती निवडावे. नोंद झाल्या नंतर जी वेळ दिली जाईल त्यावेळेतच केंद्रावर यावे लागेल. हे केंद्र शाॅप नं १ आणि २, नालंदा बिल्डींग, एवरशाईन नगर, मलाड पश्चिम येथे असुन १० मे पासुन लसीकरण प्रक्रीया सुरु केली जाईल धन्यवाद…