वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया ही भारतातील पहिली जागतिक रेकॉर्ड संस्था आहे की जी जीनिअस फाउंडेशन नॉन-प्रॉफिट रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे व्यवस्थापित केली आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया चे संस्थापक आणि अध्यक्ष श्री पावन सोलंकी तसेच वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया चे महाराष्ट्राचे सीनियर रिप्रेझेंटेटिव्ह श्री संजय विलास नार्वेकर आणि श्रीमती सुषमा गोविंद तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली मागील दहा वर्षात 3000 हून जास्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उदाहरणार्थ खेळाडू, कलाकार, इत्यादी व्यक्तींना पारदर्शकता बघून रेकॉर्डस् देण्यात आले तसेच समाजासाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रोत्साहनात्मक चांगली कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट देण्यात आले आहेत.
मुंबईच्या पहिल्या नागरिक आदरणीय महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी सध्या चालू असलेल्या covid-19 या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जनतेचा तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी “मुंबईसाठी काहीही….” या संदेशाचा स्वतः परिचारिकेचा गणवेश परिधान करून त्यांनी नायर रुग्णालयाला भेट दिली त्यांच्या या कार्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया ने घेऊन त्यांना करोना योद्धा सन्मान प्रमाण पत्राद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला.